भ्रष्टाचार रोखण्यासाठी परिवहन विभागाने ८ नवीन स्वयंचलित वाहन चाचणी मार्गांना मंजुरी


राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी परिवहन विभागाने ८ नवीन स्वयंचलित वाहन चाचणी मार्गांना मंजुरी दिली आहे. यामध्ये कल्याण, वसई-विरार, मालेगाव, धुळे, गोंदिया, सातारा कराडसोबत रत्नागिरी येथेदेखील अशा प्रकारच्या मार्गाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील अशा केंद्राची संख्या आता ४६ वर पोहोचणार आहे.
राज्यात गेल्या वर्षी मे महिन्यात ३८ स्वयंचलित चाचणी मार्गांसाठी १६६.६९ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. हे प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार ५ वर्षासाठी हे कंत्राटदार हे मार्ग चालवतील आणि त्यानंतर ते संबंधित आरटीओ विभागाकडे सोपवले जातील. कंत्राटदार नियुक्त होणार सर्व नवीन ८ मार्गासाठी ७७.२९ कोटी रुपयांचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र जीएसटी आणि आयटी पायाभूत सुविधांच्या खर्चामुळे यात ८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने कंत्राटदार नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button