नाणारच्या रणसंग्राम पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला जनतेने आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला या रिफायनरी प्रकल्पविरोधी लढा व लढय़ाला मिळालेले यश यावर आता नाणारच्या रणसंग्राम असे पुस्तक काढण्यात येणार आहे.या पुस्तकाचे मुखपृष्ठाचे अनावरण संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांच्या हस्ते पडवे येथे करण्यात आले.नाणार प्रकल्पाला जनतेने केलेला विरोध त्यामुळे हा प्रकल्प शासनाला रद्द करावा लागला या संघर्षाचे शब्दांकन या पुस्तकात करण्यात येणार असून मराठी आणि इंग्रजी भाषेतून हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे.या कार्यक्रमाला जय श्रीकृष्ण सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अशोक वालम,सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button