विनायक राऊत यांच्याकडे फक्त ६ कोटी ४६ लाख रूपयांची मालमत्ता

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी शिवसेना उबाठा गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राऊत यांनी स्वतःची आणि पत्नीच्या नावे असलेली एकूण ६ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये राऊत यांच्याकडे एक गाडी असून २३ लाख रुपयांचे दागिने असल्याचे सांगितले.निवडणूक विभागाकडे दाखल केलेल्या माहितीनुसार, विनायक राऊत यांच्याकडे ४ कोटी २५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असून ६५ लाख ३४ हजार ८२९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर पत्नी शामला राऊत यांच्या नावे ७४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असून ८२ लाख ८ हजार ५८३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button