नावडी संगमेश्वर येथे आत्मनिर्भर भारत व स्वदेशी अभियानाचा कार्यक्रम संपन्न


नावडी संगमेश्वर येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण यांच्या वतीने आत्मनिर्भर भारत व स्वदेशी अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आत्मनिर्भर भारत ही नरेंद्र मोदी यांची संकल्पना असून स्वदेशीचा स्वीकार करून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे असा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास सौं. वर्षा ताई ढेकणे (जिल्हा अध्यक्षा), सौं. नुपुरा मुळ्ये (जिल्हा सरचिटणीस, महिला मोर्चा) सौ.शितल दिंडे (तालुका अध्यक्ष )व सौं. सरिता आंबेकर (जिल्हा सचिव) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन सौं. सुमन झगडे (तालुका उपाध्यक्षा) यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सौं. रोहिणी सुर्वे (बूथ अध्यक्ष, नावडी), सौं. दीपिका जोशी, सौं. प्रियांका साळवी, सौं. अमृता कोकाटे व सौं. मुग्धा भिडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमात महिलांना स्वदेशी उत्पादनांचा वापर स्वयंरोजगाराच्या संधी बचतगटांचे महत्त्व तसेच आर्थिक स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले

उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button