रघुवीर घाटातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी तेजस ठाकरेंनी घेतला पुढाकार

रत्नागिरी ः रघुवीर घाटात आढळणार्‍या लाल टेकड्यांच्या संरक्षणासह घाटाला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. रघुवीर घाट हा निसर्गाच्या आविष्काराने सजलेला घाट असून अनेक पर्यटक त्या ठिकाणी भेट देत असतात.
मात्र त्या मानाने त्याचा अजूनही विकास झालेला नाही. या घाटात पावसाळ्यात लहान आकाराचे लाल रंगाचे खेकडे आढळतात. दोन वर्षापूर्वी तेजस ठाकरे यांनी घाटाला भेट दिली होती त्यावेळी या खेकड्याबाबतची माहिती जीवशास्त्र विभागाकडे पाठविली होती. आता लवकरच तेजस ठाकरे पुन्हा रघुवीर घाटाला भेट देणार असल्याची माहिती युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button