
परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी काढलेली शक्कल पडली महाग!
कर्नाटकातील हावेरीमधल्या एका कॉलेजने कॉपी रोखण्यासाठी तर हद्दच केली. भगत पीयू कॉलेजने डोक्यात कार्डबोर्डचे खोके घालून विद्यार्थ्यांना परीक्षा द्याला लावली. पेपर लिहिताना विद्यार्थ्यांना पाहता यावे यासाठी फक्त डोळयाकडच्या भागाजवळ खोक्यांना छिद्र करण्यात आले होते.
विद्यार्थी डोक्यात कार्डबोर्डचे खोके घालून रसायनशास्त्राचा पेपर देत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयात धाव घेतली व व्यवस्थापनाला हा प्रकार थांबवण्यास सांगितला.पीयू बोर्डाचे उपसंचालक एससी पीरजादी यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावली असून ही अमानवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com