भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी तिबेट हादरले!

:* तिबेटमध्ये आज दि. १२ मे पहाटे भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. हे धक्के इतके शक्तिशाली होते की मध्यरात्री झोपेत असलेल्या तिबेटी नागरिकांना घाबरून घराबाहेर धाव घेतली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार आज पहाटे २.४१ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) तिबेटमध्ये रिश्टर स्केलवर ५.७ तीव्रतेचा भूकंप झाला. हे धक्के इतके शक्तिशाली होते की मध्यरात्री झोपेत असलेल्या तिबेटी नागरिकांना घाबरून घराबाहेर धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याची नोंद नाही. दरम्‍यान, जानेवारीमध्ये शिगात्सेपासून सुमारे २४० किमी (१४९ मैल) अंतरावर असलेल्या तिबेटच्या टिंगरी काउंटीमध्ये ६.८ तीव्रतेच्या भूकंप झाला हाेता. यामध्‍ये १२० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले हाेते.

शुक्रवारी (दि. ९ मे) चिली आणि अर्जेंटिना येथे शुक्रवारी ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता, अशी माहिती अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दिली. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. चिलीमधील अधिकाऱ्यांनी या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या दक्षिणेकडील मॅगेलन जलसंधीच्या संपूर्ण किनारपट्टीसाठी सतर्कतेचा इशारा दिला होता. १ मे रोजी पाकिस्तानमध्ये देखील भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवली गेली होती. भूकंपानंतर लोक घराबाहेर आले होते. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदुकुश पर्वतरांगेत होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार या भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी होती. हे धक्के ३० एप्रिल २०२५ रोजी रात्री ९:५८ वाजता जाणवले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button