
संगमेश्वर डिंगणी-पिरंदवणे रस्त्यावर गव्याचा वावर
संगमेश्वर डिंगणी-पिरंदवणे मुख्य रस्त्यावर गवारेड्याचा वावर सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गवारेडा आता प्रत्यक्ष मानवी वस्तीत, शिवारात तसेच मुख्य रस्त्यावर दिसू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. पहाटे व संध्याकाळी रस्त्यावरून ये-जा करणे जीवघेणे ठरत आहे. परिणामी कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. शेतीसाठी शिवारात जाण्याचे धाडस होत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. उपजिविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
www.konkantoday.com




