आशा, गटप्रवर्तक महिला आजपासून संपावर


आशा व गटप्रवर्तक महिलांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला आणि ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येत असल्यामुळे १६ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा आशा व गटप्रवर्तक यांनी दिला आहे.
आशा आणि गटप्रवर्तक महिलांना अत्याधुनिक मोबाईल व रिचार्ज न देता सक्तीने कामे करून घेतली जात आहेत. अशा अन्यायकारक कामांमुळे दररोज १२ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागत आहे. आरोग्य अभियान मोहिमेंतर्गत २ वर्षापूर्वी आशा महिलांना मोबाईल देण्याची घोषणा केली होती. मात्र ही कागदावर राहिली आहे. आबा कार्ड, ई कार्डसह नवनवीन ऑनलाईन माहिती भरून देण्याचे काम दिले जाते. या कामासाठी १०० रूपयांचा रिचार्ज भत्ता देण्यात येतो. प्रत्यक्षात अशा कामासाठी ४०० रुपयांचा रिचार्ज मारल्याशिवाय ऑनलाईनची कामे होत नाहीत. त्यातच ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा प्रश्‍न भेडसावत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button