
सत्तेचा माज किती असावा त्याचे आ. गोपीचंद पडळकर हे उत्तम उदाहरण -शिवसेना आमदार भास्कर जाधव
दहा दिवसाचा आमदार साठ वर्षाची संसदीय कारकीर्द असणार्या नेत्यांबद्दल बोलतो ही केवळ निषेधार्ह नाही तर चुकीचे आहे. सत्तेचा माज किती असावा हे आम. पडळकर उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने आपली जबाबदारी झटकून चालणार नाही, जनतेला उत्तर द्यावेच लागेल असेही जाधव यांनी भाजपवर टीका करताना सांगितले. २०१४ साली केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आले तेव्हापासूनच भाजपच्या सर्व नेत्यांची बेताल वक्तव्ये सुरू झाली आहेत. ज्या माणसाची योग्यता नाही अशा व्यक्तीला विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलायला लावायचे आणि त्यानंतर ते त्यांचे वैयक्तीक आहे पक्षाचे मत नाही असे म्हणण्याची भाजपची जुनीच पद्धत आहे, अशीही टीका जाधव यांनी केली.
www.konkantoday.com