
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदी राजन खेडेकर यांची निवड.
चिपळूण : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची सभा नुकतीच परांजपे मोतीवाले हायस्कूल चिपळूण येथे घेण्यात आली. यावेळी या सभेमध्ये राजन रमाकांत खेडेकर यांची कार्याध्यक्ष पदासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली.
सभेला यावेळी संचालक मंडळापैकी कुंदन खातू, मल्लेश लकेश्री, सिद्धेश लाड, विनोद फणसे, शाळीग्राम विखारे, सुहास चव्हाण, सौ. शिल्पा जागुष्टे, विलास चिपळूणकर आदी संचालक उपस्थित होते.
श्री. खेडेकर हे गेली २० वर्षे श्रीराम एज्युकेशन सोसायटीमध्ये कार्यरत असून यापूर्वी विश्वस्त आणि उपकार्याध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते माजी संचालक असून जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन तसेच चिपळूण तालुका पेन्शनर संघटनेचे संघटक म्हणूनही त्यांनी पद भूषविले आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. खेडेकर यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत देवळेकर, माजी अध्यक्ष उदय गांधी तसेच उपाध्यक्ष अशोक मेहेंदळे, उल्हास पवार, सौ. सई वरवाटकर, संस्थेचे विश्वस्त वसंतशेठ उदेग, डॉ. यतीन जाधव त्याचप्रमाणे वैश्यनागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन हेमंत शिरगावकर, शिवसेना तालुका संघटक व माजी नगरसेवक राजू देवळेकर, शिवसेना शहरप्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम, युवासेना शहर प्रमुख पार्थ जागुष्टे, वैश्य युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, उद्योजक प्रथमेश कापडी, विजय गांधी, श्री. काणेकर, कमलाकर, शुभम देवळेकर, सौ. समृद्धी देवळेकर, परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊ कांबळे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी नवनिर्वाचित कार्याध्यक्ष श्री. खेडेकर यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




