ग्रामीण भागातील शिक्षणाचा उज्ज्वल दीप

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलआंबेड बूचा दहावीचा निकाल शंभर टक्के

🌸निकालाचे सर्व श्रेय शिक्षकांचे: अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी केले शिक्षकांचे कौतुक

संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी संचलित न्यू. व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल,आंबेड बुद्रुक या शाळेने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी करत यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शाळेचा विद्यार्थी अमान हारून आंबेडकर याने ८७.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच असजद सलीम सय्यद याने ७४.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तर रुद्र चंद्रशेखर नागवेकर याने ६०.८० टक्के गुण मिळवत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणे हे मोठे आव्हान मानले जाते. मात्र नवनिर्मिती फाउंडेशनने अत्यंत मर्यादित साधनसामग्रीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिस्त, नैतिक मूल्ये आणि आधुनिक शिक्षण पद्धती यांचा योग्य समन्वय साधत शाळेने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अतिरिक्त तास, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देत त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात, हे न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलने आपल्या निकालातून सिद्ध करून दाखवले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे आगामी काळात आणखी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे. शाळेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यानी शिक्षणाचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button