
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी, निकाल पुढे गेल्याने मद्य विक्री दुकाने उघडण्याचे निर्देश
नगर परिषद, नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिल्यामुळे निवडणूक निकालाच्या दिवशीच’ म्हणजेच बुधवारचा कोरडा दिवस (ड्रायडे) जिल्हाधिकार्यांनी मागे घेतला. हा आदेश बुधवारी सकाळी मद्य आणि माडी विक्री करणार्या दुकान मालकांना मिळाल्यानंतर बुधवारी सर्व दुकाने उघडली. मद्य विक्रीचे परवाने मिळवणे आणि दुकाने सुरू करण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. दरवर्षी लाखो रुपये फी भरून आस्थापनांच्या परवान्यांचे नूतनीकरण करावे लागते. अशावेळी ही दुकाने सुरू राहावीत, अशी मालकांची अपेक्षा असते.
www.konkantoday.com




