निसर्ग वादळाच्या कामात ब्लॅकमेल करणाऱ्या ठेकेदाराला व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याचे नामदार उदय सामंत यांचे आदेश

निसर्ग चक्रीवादळाचा मंडणगड, दापोली तालुक्‍याला मोठा तडाखा बसला. या नैसर्गिक आपत्तीत स्थानिकांबरोबर परजिल्ह्यातून लोक येऊन त्यांनी मदत केली; मात्र मदत सोडाच, जास्त पैसे मिळण्यासाठी ब्लॅकमेल करीत महावितरणचे दुरुस्तीचे काम ठेकेदाराने बंद केलेमहावितरणने दुरुस्तीसाठी नेमलेल्या एक ठेकेदाराने या परिस्थितीत मदत सोडा, तर जादा पैसे मिळण्यासाठी काम बंदचा पवित्रा घेतला. या मागे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने त्याला जास्त पैसे मिळविण्यासाठी ही फूस लावल्याचे समजते, असे नामदार उदय सामंत यांनी बैठकीत स्पष्ट केले. जिल्ह्यात ही प्रवृत्ती चांगली नाही. त्या ठेकेदारासह त्याला पाठिंबा देणाऱ्या त्या अधिकाऱ्याची एका समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशा सूचना सामंत यांनी महावितरणचे मुख्य अभियंता सायनेकर यांना दिल्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button