रत्नागिरी शहरात रस्त्याच्या खड्ड्यांची दुरुस्ती मुंग्यांच्या गतीने सुरू, खड्ड्यांमुळे होत आहेत अपघात


रत्नागिरी शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत त्यानंतर नगर परिषदेने याबाबत दखल घेऊन नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे जाहीर केले त्याचे प्रात्यक्षिक गाजावाजा करून करण्यात आले खुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील नवीन तंत्रज्ञानाने भरलेल्या खड्ड्यांची हातोडा मारून खात्री करून घेतली होती मात्र त्यानंतर ऊन असूनही अनेक दिवस हे काम ठप्पच होते ते कालपासून आंबेडकर पुतळ्याजवळील खड्डे नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बुजवण्यात आले आज जेल नाका येथील एका बाजूचे खड्डे या नवीन तंत्रज्ञानाने बुजवण्यात आले त्यामुळे वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र खड्डे बुजवणारे पथक तीन-चार जणांचे असून त्याचे कामकाज मुंगीच्या संत गतीने सुरू आहे हे खड्डे बुजवण्यासाठी उघाडी लागते आज उघाडी असूनही अन्य ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही त्यामुळे रत्नागिरी शहरातील खड्डे बुजवण्यास वेळ जाणार आहे शिर्के पेट्रोल पंप ते जयस्तंभ सर्कल पर्यंत मोठ्या प्रमाणावर खोलवर खड्डे पडले असून त्या ठिकाणी दुचाकी चालकांचे मोठे अपघात होत आहे आज सकाळी देखील खड्ड्यात पडून एक महिला दुचाकी जखमी झाली तर दुसऱ्या खड्ड्यात एक दुचाकी चालक कोसळला हे मोठे खड्डे असून पावसामुळे त्यात पाणी भरले की खड्ड्याची उंची न कळल्याने दुचाकीचे चाक खड्ड्यात जात असल्याने दुचाकी स्वाराचा तोल जाऊन अपघात होत आहेत रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासनाने असे धोकादायक खड्डे आधी तातडीने बुजवणे गरजेचे होते मात्र नगरपरिषद प्रशासन आपल्या पद्धतीने काम करीत असल्याने रत्नागिरी करण आणखी काही दिवस तरी खड्ड्याचा त्रास सोसावा लागणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button