माजी सैनिक व विधवांसाठी ४ फेब्रुवारी रोजी विधी सल्ला कार्यक्रम


रत्नागिरी, दि. ३० ):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने वीर परिवार सहाय्यता योजना – २०२५ अंतर्गत माजी सैनिक व माजी सैनिक विधवांसाठी कायदेशीर मदत व विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंगळवार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ११.३० वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये मोफत कायदेशीर मदत, लोक अदालत, पेन्शन, कौटुंबिक व मालमत्ता वाद तसेच वीर परिवार सहाय्यता योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button