मत्स्यालय आणि मत्स्य संग्रहालय हे  पर्यटक आणि विद्यार्थी यांच्यासाठी उत्तम पर्यटन स्थळ -सुबोधकुमार


रत्नागिरी शहरातील झाडगांव मत्स्यालय आणि मत्स्य संग्रहालय हे  पर्यटक आणि विद्यार्थी यांच्यासाठी उत्तम पर्यटन स्थळ असल्याचे कौतुकोदगार केंद्रीय अधिकारी सुबोधकुमार यांनी काढले. सुबोधकुमार यांनी नुकतीच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
सिडकोने कोकणातील समुद्रकिनारी भागातील विकास प्रकल्पांसाठी विशेष नियोजन अधिकारी म्हणून सुबोधकुमार यांची नियुक्ती केली आहे.
पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये योग्य आणि शाश्‍वत विकास, स्थानिकांचे आर्थिक सक्षमीकरण आणि व्यापक नियोजन सुनिश्‍चित करणे असे त्याचे उद्दिष्ट आहे.
सिडको प्राधिकरणाच्या विकास प्रकल्पांना अंतिम रूप देण्याकरिता सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तर सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. याच उद्देशाने कोकणातील फळबागायत, मत्स्य व्यवसाय याचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आखण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत सुद्धा उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button