बांदा येथे कारवाई करत सुमारे सहा लाखाची गोवा बनावट दारू जप्त

बांदा पोलिसानी बुधवारी दुपारी कट्टा कॉर्नर, बांदा येथे कारवाई करत सुमारे सहा लाखाची गोवा बनावट दारू जप्त केली. शहरातून जात असलेल्या एका कारची तपासणी करताना हे हे दारूचे घबाड सापडले.
या प्रकरणी तेलंगणा राज्यातील भूमेश नरसिंह इस्पी (39) व अजय कुमार अंजय्या गोपू (28) यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दारू वाहतुकीसाठी वापरलेली ताब्यातील कार तसेच ब्लेंडर्स प्राईड प्रीमियम व्हिस्की लेबल असलेल्या 81 प्लास्टिक बाटल्या (प्रत्येक 2 लिटर) किंमत 3 लाख 24 हजार) व रॉयल स्टॅग सुपीरियर व्हिस्कीच्या 92 प्लास्टिक बाटल्या (प्रत्येक 2 लिटर) किंमत 2 लाख 57 हजार 600 रू. अशी एकूण 5 लाख 81 हजार 600 रू. ची दारू व आठ लाखाची कार, असा एकूण 13 लाख 81 हजार 600 रू. चा मुद्देमाल जप्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button