
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात आफ्रिकन गोगलगाय आढळली
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात आफ्रिकन गोगलगाय आढळून आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आफ्रिकन स्नेलची ही पहिलीच नोंद झाली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र कुडाळच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी दिली आहे.आफ्रिकन स्नेल ही जगातील 100 सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक मानली जाते. ही साधारण 10-15 सें.मी. पर्यंत वाढू शकते आणि जगातील सर्वांत मोठ्या स्थलांतरित गोगलगायांपैकी ती एक आहे.
ही प्रजाती अत्यंत प्रजननक्षम असून एकावेळी 100 ते 400 अंडी घालते आणि वर्षाला अनेकवेळा अंडी देऊ शकते. माती, झाडे, शेतीमाल, वाहतूक साधने यांच्यामार्फत फार जलदगतीने ती सगळीकडे पसरते. एकदा नवी जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींना बाहेर ढकलून स्वतःचे वर्चस्व निर्माण करते. विशेषतः पाने, कोवळी फांदी, फळे व मुळे यांवर हल्ला केल्याने पिकांतून मिळणारे एकूणच उत्पन्न ढासळण्याची दाट शक्यता असते




