
रत्नागिरीकरांच्या सेवेत प्रथमचं झाडांचे वातानुकुलित दालन
आतापर्यंत आपण फक्त वातानुकुलित अशा मोबाईल, फ्रिज आणि कपड्यांच्या दुकानातचं जात आलो आहोत परंतु आता वृक्षवल्ली या एकाच छताखाली तुम्हाला संपुर्ण नर्सरीमधील विविध प्रकारची फळझाडे, फुळझाडे, शोभिवंत तसेच घरात ठेवता येण्याजोगी झाडे उपलब्ध झालेली आहेत. वृक्षवल्लीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तु्म्ही गिफ्ट म्हणून तुमच्या प्रिय व्यक्तिंना या ठिकाणाहून अनेक गोष्टी देऊ शकता.त्यासाठी त्यांनी खास मेहनत घेतली आहे.आज दि. ३१ ऑगस्ट रोजी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी माननिय श्री. सुनिलजी चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले.त्यावेळी माजी कुलगुरु श्रीरंग कद्रेकर सर, राहुल पंडित, वेदा मुकादम (प्रेसिडंट रोटरी क्लब रत्नागिरी) आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सर्व सभासद उपस्थिती होते.
www.konkantoday.com