सी वर्ल्ड प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या कंपनीने गाशा गुंडाळला

सिंधुदुर्ग- मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवली येथील प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्प उभारण्याची पुणे येथील ज्या कंपनीने जबाबदारी घेतली होती ती कंपनी बोगस निघाली असून तिने येथील गाशा गुंडाळला आहे असा गौप्यस्फोट करतानाच माझा या प्रकल्पाला विरोध नाही पण हा प्रकल्प खाजगी व्यक्ती किंवा समूह उभारणार असल्याने जमिनींचे भूसंपादन करण्यास विरोध आहे, अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली.
जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात सी वर्ल्ड संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते. १३०० एकर जमिनीमध्ये होणारा हा प्रकल्प आम्ही ३५० एकरवर आणला. हा प्रकल्प व्हावा अशी माझ्यासह येथील जनतेची इच्छा आहे. पूर्वीच्या सरकारने या प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादीत करण्यास १०० कोटी रुपये मंजूर केले होते पण हा प्रकल्प तीन हजार कोटींचा आहे. तो खाजगीरित्या उभारला जाणार आहे. शासन उभारत नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करण्यास माझा विरोध आहे. जोपर्यंत प्रकल्प उभारणारी कंपनी निश्‍चित होत नाही तोपर्यंत जमिनी संपादन करून काय उपयोग? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button