एकतर्फी मजनूने एका शाळकरी मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला….

सातारा शहरातील धक्कादायक आणि चिंता निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला.

एकतर्फी मजनूने एका शाळकरी मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला, तेव्हा संपूर्ण कॉलनी घाबरली.लोक त्याला थांबवत होते, पण तो सर्वांना धमकी देत होता.या घटनेनंतर संपूर्ण सातारा पोलिस प्रशासनासह महाराष्ट्रच हादरला, एका अल्पवयीन शाळकरी मुलीला जबरदस्तीने पकडत, तिच्या गळ्याला चाकू लावून एका सनकी आशिकने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना सातारा शहरात घडली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं, सुदैवाने उमेश आडगळे नावाच्या व्यक्तीने पाठिमागून येत या माथेफिरू तरुणाच्या हातातील चाकू काढून घेत मुलीची सुटका केली. त्यानंतर, परिसरातील नागरिकांनी या तरुणास पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button