
सावर्डे येथे उभ्या असलेल्या ट्रेलरला दुचाकीस्वाराची पाठीमागून जोरदार धडक, दुचाकी स्वाराचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. सावर्डे येथे उभ्या असलेल्या ट्रेलरला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अजय अशोक सुतार (29, वालोटी वाडी, सावर्डे, चिपळूण ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे
प्राथमिक माहितीनुसार, ट्रेलर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना चालकाने सावर्डे येथे नाश्त्यासाठी गाडी थांबवली होती. त्याचवेळी चिपळूनहून येणाऱ्या दुचाकीस्वार अजयने ट्रेलरला मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तो घटनास्थळीच मृत झाला.