
मानस मनोविज्ञान स्वास्थ्य केन्द्र आणि मनोदया संस्था आयोजित ” पासवर्ड आनंदाचा” आपला आनंद आपल्या हातात! यावर आधारित लघुपट आणि परिसंवादाचे डोंबिवली पूर्व येथे आयोजन!
संदेश सुरेश जिमनगर्दीत माणसांच्या मी हरवून मलाच बसलो, नसते उगाच मोहमी कवटाळून त्यांस फसलो!ही मनाची उत्कट भावना शब्दात गुंफताना खरोखरच कष्ट होतात.एका वळणावर दुःखाचा डोंगर आकाशाला गवसणी घालतो. मनावर नैराश्याचं मळभ दाटतं आणि माणुस प्राणी दुःखाचा विलाप करतो. याच मनाचे कंगोरे उलगडून सांगण्यासाठी मानस सायकॉलॉजी हेल्थ सेंटर आणि मनोदया ट्रस्ट आयोजित “पासवर्ड आनंदाचा” अर्थात आपला आनंद आपल्या हातात या अभिनव उपक्रम येत्या रविवारी दिनांक २९ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ब्राह्मण सभा हॉल, पहिला मजला , डोंबिवली पूर्व येथे पार पडणार आहे. सर्वांसाठी प्रवेश मोफत दिला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.राजेंद्र बर्वे (प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ -लेखक) आणि प्रा. अभिजित देशपांडे (फिल्म अभ्यासक, प्राध्यापक सोमैया महाविद्यालय)उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी संवादक म्हणून प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये , समुपदेशक अदिती प्रभुघाटे कामत हे आपली जबाबदारी चोख पार पाडतील. “मनाचिये गुंता ” अधिक स्पष्टपणे उलगडण्याचा आणि कायम आनंदी राहण्यासाठीचा गुप्त पासवर्ड उपस्थित राहणाऱ्यांना नक्कीच आनंद देऊन जाईल यात शंका नाही.शक्य असेल त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या आणदांची लयलूट करावी, जगण्याला नवी दिशा देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरेल!