
रत्नागिरी तालुक्यातील फणसोप सडा येथे दुचाकी अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील फणसोप सडा येथे दुचाकी अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू झाला. सिद्धेश संदीप पर्शुराम (२४) असे मृताचे नाव आहे. तर या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला वैभव रघुनाथ पवार (३०) हा देखील जखमी झाला होता. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. ९ जून रोजी सिद्धेश हा आपली दुचाकी (एमएच ०१ डीएफ ३५२४) घेवून फणसोप सडा येथून जात होता. सकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्याची दुचाकी स्लीप होवून अपघात झाला होता.www.konkantoday.com