भाजप नेत्यांच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंचे शिलेदार सुधाकर बडगुजर यांचा भाजप मध्ये प्रवेश


अखेर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश मुख्यालयात हा पक्षप्रवेश झाला. भाजप नेत्यांच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंचे शिलेदार सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाला आहे.चारचाकी वाहनं, 100 बसेस आणि 4 हजार कार्यकर्त्यांसोबत बडगुजर मोठं शक्तिप्रदर्शन करत मुंबईकडे रवाना झाले. यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाची चांगलीच चर्चा रंगली होती. मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती.

भाजप नेत्यांच्या विरोधामुळं सुधाकर बडगुजर यांचा पक्ष प्रवेश गेल्या काही दिवसांपासून रखडला होता. अखरे सुधाकर बडगुजर यांनी कमळ हाती घेतले आहे. गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाणांच्या तंबीनंतर काही स्थानिक नेत्यांनी बडगुजरांच्या प्रवेशाला संमती दर्शवली. आमदार सीमा हिरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विरोध मावळला नसल्याचं स्पष्ट केलंय. काही दिवसांपूर्वीच नाराज आमदार सीमा हिरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिका-यांसोबत चंद्रशेखर बावनकुळेंचीही भेट घेतली होती.बडगुजरांना प्रवेश देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर नेतेही प्रवेशावेळी उपस्थित आहेत. सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी समाज कल्याण मंत्री बबन घोलप, माजी नगर सेवक मनसे दिलीप दातीर, माजी नगर सेवक राष्ट्रवादी मनोहर बोराडे, बाळासाहेब सानप, सामाजिक कार्यकर्ते कैलास चुंबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button