
पोषण आहारासाठी वाढीव खर्च मर्यादा शासनाकडून मंजूर.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना सुधारित आहार खर्चाच्या दरास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे पोषण आहार उपलब्ध करणार्या यंत्रणेला वाढीव मानधन मिळणार आहे.इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक गटासाठी प्रतिदिन लाभार्थी, आहार खर्च मर्यादा ६.७८ रुपये एवढी ठरवून देण्यात आली आहे. तर उच्च प्राथमिक वर्गांसाठी म्हणजे इयत्ता ६ वी ते ८ वी वर्गासाठी रुपये १०.१७ एवढा खर्च प्रतिदिन प्रति लाभार्थी करण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये तांदळासोबतच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळा स्तरावर करण्यात राज्य शासनाचा निर्णय येतो. या मालापासून आहार बनवण्यासाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी करण्यासाठी नवी रचना घालून देण्यात आली आहे.www.konkantoday.com