नितेशने जपून बोलावे -आमदार निलेश राणे यांचा भावाला सबुरीचा सल्ला


मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. धाराशिव येथे नुकताच भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. ‘सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा’, असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं होतं.याही पुढे जाऊन त्यांनी म्हटलं होतं की ‘कुणी कितीही ताकद दाखवली, कुणी कसेही नाचले तरी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत.’ त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीतच नाराजी व्यक्त होत आहे. नितेश राणे यांचे सख्खे भाऊ आमदार निलेश राणे यांनीच त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ‘नितेशने जपून बोलावे’, असे निलेश राणे यांनी म्हटले आहेआमदार निलेश राणे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट लिहिली आहे. ‘नितेशने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.’ अशा शब्दांत त्यांनी भाऊ नितेश राणे यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button