
खेड-तिसंगीतील विवाहितेचा झाडावरून पडून मृत्यू
खेड तालुक्यातील तिसंगी येथील विवाहितेचा झाडावरून पडून उपचारादरम्यान मृत्यू झाला. भारती कृष्णा जाधव असे मृत विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही विवाहिता तिसंगी-पिंपळवाडी येथील मदन भोसले यांच्याकडे भाड्याने राहत होती. ती झाडावर चढली असता तोल गेल्याने खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले.
www.konkantoday.com




