चिनाब पुलाचे उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदीनी तिरंगा फडकवला


पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी त्यांनी रियासी जिल्ह्यात बांधलेल्या चिनाब पुलाचे उद्घाटन केलेयावेळी पंतप्रधान मोदी तिरंगा फडकवताना दिसले. भारताच्या सीमा आणि सार्वभौमत्वाला वारंवार आव्हान देणाऱ्या चीन आणि पाकिस्तानला हा एक कडक संदेश होता.

हा पूल चिनाब नदीवर बांधला गेला आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल मानला जातो. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चिनाब पुलाची उंची ३५९ मीटर (सुमारे १,१७८ फूट) आहे, जी आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. स्टील आणि काँक्रीटपासून बनलेला हा पूल केवळ अभियांत्रिकी दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही तर काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी रेल्वेने जोडण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे. उद्घाटनापूर्वी, पंतप्रधान मोदींनी चिनाब रेल्वे पुलाची पाहणी केली आणि बांधकाम कामात सहभागी अभियंते आणि कामगारांशी संवाद साधला, त्यांनी या अभूतपूर्व अभियांत्रिकी प्रकल्पाच्या तांत्रिक पैलूंबद्दल माहिती घेतली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button