
हगवणेचे मामा IPS जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाचा दणका, फडणवीस यांचा मोठा निर्णय.
वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाचे मामा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हे आरोपींना मदत करत असल्याचा आरोप कस्पटे कुटुंबियांनी केल्यानंतर गृहविभागाने सुपेकर यांना दणका दिला आहे. सुपेकर यांच्याकडून राज्यातील तीन महत्वाचे कार्यभार काढण्यात आलेले आहेत. सुपेकर यांच्यावर कारवाई करून हगवणे कुटुंबाला जो मदत करेल, त्याच्यावर अशीच कारवाई होईल, असा मेसेज गृह विभागाने दिला आहे.
जालिंदर सुपेकर यांचा आमच्याशी कोणताही संबंध नाही. मात्र सुपेकर हे हगवणे यांचे मामा आहेत. त्यांच्या जीवावर आम्ही काहीही करू शकतो, अशी धमकी हगवणे यांच्याकडून सातत्याने दिली जायची, असे वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी माध्यमांना सांगितले. तसेच जालिंदर सुपेकर यांची एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यानंतर हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकर हे प्रकाशझोतात आले होते. आरोपींना मदत करत असल्याचा आरोप झाल्यानंतर सुपेकर यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.जालिंदर सुपेकर यांना प्रदान केलेल्या अधिकारात कपात करण्यात आलेली आहे.
राज्यातील तीन महत्वाचे कार्यभार सुपेकर यांच्याकडून काढण्यात आलेले आहेत. नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षकाचा अधिकार सुपेकर यांच्याकडून काढण्यात आले आहेत.जालिंदर सुपेकर यांच्याकडून अधिकार काढून घेऊन हे अधिकार इतर तीन अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. सुपेकर हे आरोपींना मदत करत असल्याचा आरोप झाल्यानंतर गृहखात्याने लगोलग अधिकृत आदेश जारी केलेले आहेत.जालिंदर सुपेकर यांच्याबातीत शासनाने काढलेल्या आदेशात काय म्हटले आहे?कारागृह उप महानिरीक्षक हे कारागृह विभागातील अत्यंत महत्वाचे व जबाबदारीचे पद आहे. सध्या कारागृह विभागाच्या कारागृह उप महानिरीक्षक या संवर्गात ०५ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी ०२ पदे भरलेली असून ०३ पदे रिक्त आहेत.
जालिंदर सुपेकर यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदाचा नियमित कार्यभार आणि कारागृह विभागातील “कारागृह उप महानिरीक्षक या संवर्गातील पाच पदांपैकी रिक्त असलेल्या तीन पदांचा (नाशिक विभाग, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर अतिरिक्त कार्यभार आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसोवा, महाराष्ट्र राज्य पुणे हे जबाबदारीच्या दृष्टीने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, या पदानंतर महत्वाचे पद आहे. त्यामुळे श्री. जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेल्या कारागृह उप महानिरीक्षक वा संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा (नाशिक विभाग, नाशिक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार ठेवणे प्रशासकीयरष्ट्या उचित नाही. तसेच, “कारागृह उप महानिरीक्षक या कनिष्ठ संवर्गातील पदाचा कार्यभार “विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे या वरिष्ठ संवर्गातील पदावर कार्यरत असलेल्या अधिका-याकडे सोपविणे योग्य नाही.