
दापोली तालुक्यातील भोपण येथे एका मद्यधुंद मुलाने जेवण करत असलेल्या आई आणि बहिणीवर चाकूने हल्ला केला
दापोली तालुक्यातील भोपण येथे एका मद्यधुंद मुलाने जेवण करत असलेल्या आई आणि बहिणीवर चाकूने हल्ला केला, तर वडिलांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना १४ मे रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली. याप्रकरणी स्वप्नील सुभाष वेळणस्कर (वय ३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील याची आई, त्यांचे पती आणि बहिण हे घरी जेवण करत होते. त्यांचा धाकटा मुलगा स्वप्नील हा उशिरापर्यंत घरी न आल्याने आईने पती त्याला शोधण्यासाठी वाडीत गेले. काही वेळानंतर ते स्वप्नीलला घेऊन घरी आले. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता.
फिर्यादी यांनी त्याला जेवण वाढले, परंतु जेवण करत असताना तो त्यांना शिवीगाळ करू लागला. फिर्यादी यांनी त्याला उगाच ओरडू नको असे सांगितल्यावर त्याला राग आला. त्याने घरातील किचनमधील सुरी घेतली आणि फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पंजाला मारून त्यांना जखमी केले.आईला वाचवण्यासाठी त्यांची मुलगी आणि तिचे पती धावले असता, स्वप्नीलने त्यांच्या हातातील सुरीने मुलगी आराध्या हिच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून तिलाही जखमी केले. तसेच, त्याचे वडील सुभाष यांना हाताने मारहाण केली आणि मध्ये पडल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे.