नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी* *माजी सैनिकांची स्वयंसेवक नोंदणी.

रत्नागिरी, दि. 13 ): शासनाच्या नागरी संरक्षण संचालनालयाच्या ९ मे च्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान दरम्यान चालू असलेल्या “ऑपरेशन सिंदूर” च्या अनुषंगाने सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणून नोंदणी / भरती करायचे आहे. जेणेकरुन अनुभवाचा वापर संघटनेला होऊ शकतो आणि त्यामुळे नागरी संरक्षण दलाचे कार्य अधिकच चांगल्या प्रकारे गतिमान होऊ शकते. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे किंवा ८२१०२५२८३० या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button