
कोमसापचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांचा राजीनामा मंजूर, प्रभारी अध्यक्ष प्रा. अशोक ठाकुर यांची निवड
रत्नागिरी ः कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी दिलेला राजीनामा मालगुंड येथे झालेल्या केंद्रीय समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. त्यांचे जागी प्रभारी अध्यक्ष म्हणून प्राध्यापक अशोक ठाकूर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
डॉ. महेश केळुसकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देत असल्याचे पत्र परिषदेकडे दिले होते. त्याबाबत मालगुंड येथे झालेल्या सभेत त्यावर निर्णय घेण्यात आला. व केळुसकर यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. नियमाप्र्रमाणे नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होईपर्यंत प्रा. ठाकूर यांचेकडे अध्यक्षपदाचा भार सोपविण्यात आला आहे. या सभेला कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कार्याध्यक्ष नमिता कीर, भास्करराव शेट्ये, अरूण नेरूरकर, रमेश कीर, गजानन पाटील, कार्यवाह माधव अंकलगे, शशिकांत तिरोडकर आदीजण उपस्थित होते.
www.konkantoday.com