खेड तालुक्यातील काडवली-केळणे मार्गावर अवैध गुरे वाहतुकीवर कारवाई

खेड तालुक्यातील काडवली-केळणे मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुरांची बेकायदेशीररित्या वाहतूक करणारी बोलेरो पिकअप व्हॅन ग्रामस्थांच्या मदतीने पकडली. नितीन गंगाराम चव्हाण (३५ रा. आंबडस-खेड) याला ताब्यात घेण्यात आले. २० हजार रुपये किंमतीच्या दोन गुरांसह ४ लाखांची बोलेरो पिकअप व्हॅन पोलिसांनी हस्तगत केली. नितीन चव्हाण हा बोलेरो (एमएच ११ बीएल ३४३१) पिकअप व्हॅनमधून दोन गुरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच सापळा रचला.

या बाबत वावे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे यांना खबर दिल्यानंतर सहकार्‍यांसमवेत काडवली-केळणे मार्गावर पोहचले. या मार्गावर बोलेरो पिकअप व्हॅनची पोलिसांनी झडती घेतली असता २ गुरे आढळली. संशयिताकडे विचारणा केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी दोन गुरांसह बोलेरो व्हॅन जप्त करत येथील पोलीस ठाण्याच्या आवारात आणली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button