बेळगाव येथे ४ ऑक्टोबरला ‘माजी सैनिक संपर्क व समस्या निवारण महामेळावा’; उपस्थित राहण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि. १० ): ‘रेकॉर्ड्स द मराठा एल आय’ यांच्या वतीने रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी बेळगाव (कर्नाटक) येथे भव्य “माजी सैनिक मेळावा” (ESM Outreach Programme) आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी स्टेडियम, मराठा एलआयसी, बेळगाव येथे हा महामेळावा सकाळी ६ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.
या मेळाव्यामध्ये सर्व श्रेणींमधील माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, विधवा भगिनी तसेच त्यांच्या अवलंबितांच्या विविध समस्यांचे थेट निवारण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, विधवा भगिनी व त्यांच्या कुटुंबियांनी या मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. दरम्यान, मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी आपल्या उपस्थितीबाबत greatgorilla@nic.in या ई-मेलवर पूर्वनोंदणी करावी, असेही पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button