दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

कपडे वाळत घालताना तोल गेल्याने अपघात; गोळपसडा येथील घटना

रत्नागिरी : तालुक्यातील गोळपसडा येथे राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी झालेल्या ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. योगिता मारुती नार्वेकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली होती. उपचार सुरू असताना १९ ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता नार्वेकर या १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर कपडे वाळत घालत होत्या. यावेळी अचानक तोल गेल्याने त्या खाली पडल्या. या दुर्घटनेत त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

अपघातानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच १९ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी चंद्रकांत मारुती नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button