
अलीबाग समुद्रात मासेमारी बोट बुडाली
अलिबाग :- अलिबाग समुद्रात करंजा येथील मासेमारी बोट बुडाली. यामध्ये ९ खलाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या बोटमधील सर्वजण सुखरूप आहेत. त्यांच्यावर डिझेल स्टोरेज टॅंक आणि बोयांच्या साथीने खलाशी किनाऱ्यावर सर्वाना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. बोटीचे नाव नमो शिवाय (IND- MH -47- MM- 223) आहे. बोट मालक राजेश प्रकाश नाखवा असुन करंजा गावची बोट असल्याचे समजते आहे.
वसंता बामा पाटील, धावू गोविंद तांडेल,गजानन अर्जुन जोशीं, नितीन जनार्दन ठाकूर, उमाजी बालाजी पाटील, रुपेश जनार्दन पाटील, नारायण मंगल्या कोळी, परशुराम शांताराम पाटील अशी वाचलेल्या खलाशांची नावे आहेत.
www.konkantoday.com