बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर जुहू परिसरात गोळीबार3 हल्लेखोर, 7 गोळ्या झाडल्या, चालक जखमी, जीवघेण्या हल्ल्यातून टायगर श्रॉफ वाचला


बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी संध्याकाळी जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाने संपूर्ण सिनेसृष्टीत आणि देशभरात खळबळ उडाली आहे.टायगरवर झालेल्या गोळीबाराचे काही व्हिडीओ आणि फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेची आता सविस्तर माहिती समोर आली आहे. हल्लोखोरांनी सात गोळ्या झाडल्या, तरी टायगरचा जीव कसा वाचला? याचाही माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?

१८ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी सात वाजून ३ मिनिटांनी टायगर श्रॉफवर प्राणघातक हल्ला झाला. जुहूतील पुष्पा नरसी पार्कजवळ हा गोळीबार झाला. टायगर हा पुष्पा नरसी पार्क परिसरात फुटबॉल खेळण्यासाठी आला होता. सायंकाळी पाच ते सात या वेळेसाठी येथील फुटबॉल टर्फ बूक करण्यात आलं होतं. इथं दोन तास फुटबॉल खेळल्यानंतर टायगर श्रॉफ आपल्या BMW कारमधून घरी परतत होता. तो टर्फमधून बाहेर पडताच त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला.ज्यावेळी टायगरवर हल्ला झाला, तेव्हा त्याच्या गाडीच्या पुढे अभिनेता अपारशक्ती खुराना याचीही कार होती. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हल्ला झाला, तेव्हा टायगर सीट मागे करून बसला होता. त्याची ही सवय लकी ठरली. या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला. या हल्ल्यात एकूण ७ राऊंड फायरिंग करण्यात आलं.प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, किमान दोन हल्लेखोर गोळीबार करत होते, तर तिसरा व्यक्ती बाईकजवळ उभा होता. गोळीबाराच्या या आवाजामुळे सुरुवातीला अनेकांना तो फटाक्यांचा आवाज वाटल्याचे प्रत्यक्षदर्शी सलमा शेख यांनी सांगितले.

या हल्ल्यात टायगर श्रॉफला कोणतीही गोळी लागलेली नाही, मात्र त्याला किरकोळ इजा झाली असून डॉक्टरांच्या तपासणीनंतर तो सुरक्षित असल्याचे स्पष्ट झालं आहे. काल रात्री उशिराच त्याला प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांच्या सुरक्षेत घरी पाठवण्यात आलं. परंतु, या हल्ल्यात टायगरचा ड्रायव्हर फिरदोश याच्या डाव्या हाताला गोळी लागली असून, तसेच टायगरला पाहण्यासाठी आलेला फॅन उमेष चव्हाण हा देखील जखमी झाला आहे. फॅनवर कूपर रुग्णालयात, तर टायगर आणि त्याच्या ड्रायव्हरला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळ सील केले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आरोपींनी टायगरच्या ड्रायव्हरच्या फोनवर ऑडिओ क्लिप आणि मेसेज पाठवल्याचीही माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button