
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी माजगाव येथे रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन रुग्णवाहिकेतील रुग्ण असलेली वृद्ध महिला जखमी.
गोवा येथून खाजगी रुग्णवाहिकेतून पुण्याच्या दिशेने जात असताना माजगाव येथील मांडव हॉटेल नजीक रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्ण असलेली वृद्ध महिला जखमी झाली.घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी जाधव आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमे वृद्ध महिलेसह रुग्णवाहिकेतील तिच्या सहकारी परिचारिकांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने आतील रुग्ण महिला तसेच परिचारिका व चालक यांना मोठी दुखापत झाली नाही.गोवा येथून सिस्टर उबाल्डा डिसोजा (७९) यांना उपचारासाठी खाजगी रुग्णवाहिकेतून पुणे येथील रुग्णालयात नेण्यात येत होते. जुन्या मुंबई गोवा महामार्गाने सावंतवाडीच्या दिशेने येत असताना माजगाव मांडव हॉटेल लगत रुग्णवाहिका पलटी होऊन अपघात झाला या अपघातातसिस्टर उबाल्डा डिसोजा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सिस्टर बेनिता अल्मेडा (६१ ), सिस्टर जेसीता फर्नांडिस (५०), सिस्टर इसीजा फर्नांडिस (५० ) या चौघानाही किरकोळ दुखापत झाली.