कोतळूक येथील कबड्डी स्पर्धेत तृप्तीनगर अडूर विजेता तर श्रीराम दत्त सेवा आरे संघ उपविजेता.

भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजनआबलोली : भारतीय जनता पार्टी गुहागरचे तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य नीलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच कोतळूक ग्रामदेवता श्री झोलाई व श्री वाघजाई देवीच्या पालख्यांचे सहाणेवर आगमन झाले याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गुहागर तालुकास्तरीय साखळी कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद तृप्तीनगर अडूर संघाने पटकावले, तर श्रीराम दत्त सेवा आरे संघ उपविजेता ठरला. राजा हिंदुस्थानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी यांच्या वतीने ही स्पर्धा कोतळूक ग्रामदेवता सहाणेसमोर नुकतीच घेण्यात आली.

गुहागर तालुकास्तरीय मातीवरील साखळी पद्धतीच्या कबड्डी स्पर्धेतील विजेत्या तृप्तीनगर अडूर संघास रोख रक्कम १० हजार व गदा आणि उपविजेता श्रीराम दत्त सेवा आरे संघास रोख रक्कम ५ हजार व गदा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक साई श्रद्धा बाग, तर चतुर्थ क्रमांक सेव्हन स्टार गुहागर यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामस्थ बापू महाडिक, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस दिनेश बागकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अडूर संघाचा प्रणय हळये याला टॉवर फॅन, उत्कृष्ट पकड अमर नाटुस्कर, चढाई आरे संघाचा अविनाश शेटे यांना सन्मानित करण्यात आले. तर अंतिम सामना सामनावीर प्रसन्न नार्वेकर याला पाण्याचा जार देण्यात आला.

भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सुवासिनींनी औक्षण करून केक कापून व भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या दोन दिवसांमध्ये कोतळूक सरपंच सौ. प्रगती मोहिते, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, जिल्हा सरचिटणीस माजी उपसभापती विठ्ठल भालेकर, स्पर्धेला बहुमोल सहकार्य करणारे कार्तिक कळझुणकर, झी २४ तासचे प्रणव पोळेकर, केतन पवार, जिल्हा उपाध्यक्ष, श्री दुर्गा देवी देवस्थान ट्रस्ट गुहागर अध्यक्ष किरण खरे, श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड अध्यक्ष शार्दुल भावे, कार्यवाह अमरदीप परचुरे, भाजपा गुहागर विधानसभा संयोजक सतीश मोरे, देवखेरकी उपसरपंच गणेश हळदे, महेश तटकरे, भाजपा गुहागर तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, दिनेश बागकर, आशिष विचारे, साईनाथ कळझुणकर, महिला आघाडीच्या अपूर्वा बारगोडे, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, दिलीप बागकर, संतोष सांगळे, मंदार पालशेतकर, नाना पालकर, महेश तोडणकर, नितीन कनगुटकर, सुनील भेकरे, कोतळूक सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, व्हा. चेअरमन अनंत चव्हाण, देवस्थान कमिटीचे सचिव सिताराम कावणकर, आबा आरेकर, पोलिस पाटील संचिता मोहिते, विनोद शिगवण, मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर, उदमेवाडी अध्यक्ष समीर ओक, उपाध्यक्ष नरेश बागकर आदींसह बहुसंख्येने मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.कबड्डी स्पर्धा निरीक्षक म्हणून पराग भोसले, पंच प्रमुख समीद घाणेकर यांनी काम पाहिले तर समालोचन दीपक देवकर, साई दाभोळकर, सुयोग आरेकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजा हिंदुस्थानी मंडळातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button