मडगाव ते मंगळूर मार्गावर धावणार्‍या गाड्यांच्या सेवांवर परिणाम. ३१ मार्चपर्यंत मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावरील पदुबिद्री रेल्वेस्थानकातील पॉइंट क्र. १०३ व ११६ बदलण्याचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात आले आहे. यामुळे ३१ मार्चपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मडगाव ते मंगळूर दरम्यान धावणार्‍या रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार आहे.शुक्रवारी मडगाव-मंगळूर मेमू एक्सप्रेस मडगाव ते इन्नाजे दरम्यान ५० मिनिटांसाठी तर मंगळूर-मडगांव वंदे भारत एक्सप्रेस ठोकूर ते नंदीकूर विभागादरम्यान २० मिनिटांसाठी थांबवण्यात आली. २९ मार्च रोजी मडगांव-मंगळूर मेमू एक्सप्रेस मडगांव ते इन्नाजे दरम्यान ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. मंगळूर-मडगांव वंदे भारत एक्सप्रेस ठोकूर ते नंदीकूर दरम्यान २० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button