मद्यधुंद अवस्थेत बस चालवून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केलेल्या चालकाचे अखेरीस निलंबन, राज्य परिवहन महामंडळाने केली कारवाई.

दोन दिवसांपूर्वी खेड एसटी आगारातील चालकाने खेड पन्हाळजे या ग्रामीण भागात जाणार्‍या एसटी बसवर मद्यधुंद अवस्थेत तसेच बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळल्याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या खेड आगारातील बस चालक एम. ओ. हाके या चालकाला अखेर नियंबित करण्यात आले आहे.

तीन महिन्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे.खेड तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या खाडीपट्टा विभागातील खेड पन्हाळजे या एसटी बसमध्ये घडलेला हा प्रकार अक्षरशः प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button