
श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, रत्नागिरीतर्फे ८ मार्च रोजी रक्तदान शिबीर
रत्नागिरी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाला प्रारंभ झाला असून, यानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने ८ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तरंजित बलिदानामुळे हिंदु धर्म टिकला. त्या धर्मवीरांच्या बलिदानाप्रित्यर्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, रत्नागिरीतर्फे ८ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत टीआरपी (रत्नागिरी) येथील अंबर हॉल येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त हिंदु बांधवांनी बहुसंख्येने रक्तदान करून धर्मवीर संभाजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करावी. तसेच अधिक माहितीसाठी देवेंद्र झापडेकर (७०२००२४२४२), जयदीप साळवी (९४२२४२९५७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी च्या वतीने करण्यात आले आहे.