९५ किलोमीटर अंतरावर प्रवास लोटांगण घालत करत ज्योतिबाचा भक्त ज्योतिबा डोंगरावर दाखल.

देवावर श्रद्धा असेल की फक्त त्यासाठी काही करण्यास तयार असतो ज्योतिबाच्या अशाच एका भक्ताने 95 किलोमीटर लोटांगण घालत ज्योतिबाच्या डोंगरावर जाऊन दर्शन घेतले४५ वयाचा अंगाने सडपातळ एक भक्त चक लोटांगण घालत ९५ किलोमीटर अंतरावर प्रवास करत आज सकाळी साडे अकरा वाजता जोतिबा डोंगरावर दाखल झाला. सुरेश मुळीक शाळगांव ता. कडेगाव जि सांगली असे या भक्ताचे नांव आहे.४ फ्रेबुवारीला सकाळी त्यांनी लोटांगण घेत प्रवास सुरू केला .

दररोज त्यांनी ९ ते १० किलो मीटर अंतर लोटांगण घालत पूर्ण केले. आज तेरा दिवसांनी ते डोंगरावर पोहचले. लोटांगण घालत असताना कधी डांबरी कधी रस्ता कच्चा रस्ता पायरी रस्ता पाणंद रस्ता चिखल वाट कधी काटे कुटे वाट होती. पण भक्तीसाठी ही वाट तुडवत लोटांगण घातलं. मूळीक याच्या भक्ताला येणाऱ्या जाणाऱ्यानी सलाम ठोकला . येत्या तेरा दिवसात त्यांनी एक गोळी ही घेतली नाही. मुखात केवळ जोतिबा देवाचा गजर करीत त्यांनी हे लोटांगण पूर्ण केले. त्यांच्यासोबत दहा बारा लोक आहेत. जेवणाचे साहीत्य घेऊन व टेम्पो आहे .

सकाळी लवकर उठून लोटांगण दुपारी एक दीड वाजता बंद पुन्हा थोडी विश्रांती पुन्हा सांयकाळी लोटांगण घालत पुढचा प्रवास सुरु होतो रात्री सातपर्यंत.श्री मूळीक यांनी लोटांगण घालत देव दर्शनाला जाण्याचा पहिला प्रयोग शाळगाव ते मसवड हा आठ वर्षांपूर्वी केला. त्यानंतर ते साळगाव ते पंढरपूर सोनारी परांडा गानगापूर या ठिकाणी लोटांगण घालत गेले. उद्या सकाळी ते जोतिबा डोंगरावरून लोटांगण घालत श्री क्षेत्र आदमापूर येथे जाणार आहेत. आठ ते दहा दिवसांनी ते तेथे पोहचतील तेथून त्यांचे साळगांवला प्रस्थान होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button