कुष्ठरोग रुग्णांना  लोकसहभागातून पक्की घरे -आमदार उदय सामंत यांचा पुढाकार

रत्नागिरी तालुक्यातील उद्यमनगर येथे लोकसहभागातून कुष्ठरोग रुग्णांसाठी उभारलेल्या घरांचे उदघाटन म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत व पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कुष्ठरुग्णांना घरे बांधून देण्यामध्ये उद्योजक सुरेश गुंदेजा मुकेश गुंदेजा मनोज गुंदेचा आमदार उदय सामंत आदींचा सिंहाचा वाटा आहे. उद्यमनगर येथे उभारण्यात आलेल्या घरकुलांच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते लाभार्थींना देण्यात आल्या.याप्रसंगी नगराध्यक्ष बंड्या साळवी उद्योजक किरण सामंत, जि,प,सदस्य तथा उप जिल्हा प्रमुख बाबू महाप, पंचायत समिती सभापती विभाजली पाटील,जिल्हा परिषद सदस्य स्नेहा सावंत पंचायत समिती सदस्य स्नेहा चव्हाण,उपजिल्हाप्रमुख संजीव साळवी समाज कल्याण सभापती प्रकाश रसाळ जेष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांच्यासह हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत व पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंडे यांनी गुदेजा बंधूच्या या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले. यावेळी अलिमिया काझी ग्राम विकास अधिकारी वासुदेव सावके ग्रामपंचायत सदस्य सौ,रहिमत काझी, सचीन सनगरे,उजेर काझी, गणेश भरणकर बाबू शेट्ये,प्रभाकर पालकर,माजी सरपंच साक्षी कुमठेकर परेश कुमठेकर सरपंच वैशाली गावडे अादि उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button