
उदय सामंत यांच्या प्रयत्नाने जिल्हा क्रीडा संकुलास सुधारित निधी.
रत्नागिरी एमआयडीसीमध्ये उभारणी होत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी आवश्यक १५ कोटींहून अधिक रूपयांच्या निधीची मागणी शालेय क्रीडा विभागाकडे करण्यात आली होती. यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे उर्वरित १५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.मागील काही वर्षापासून रखडलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला गती आली नव्हती.
रत्नागिरी एमआयडीसीमध्ये आता मंजूर झालेल्या सुधारित अंदाजपत्रकामुळे लवकरच जिल्ह्याचे अद्ययावत क्रीडा संकुल उभे राहणार आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या ७ कोटी रुपयांमध्ये या कार्यालयाची देखणी इमारत उभी राहिली होती. त्यानंतर संकुलाच्या कामाला काही प्रमाणात संथगती आली होती. यासाठी आवश्यक १५ कोटींहून अधिक रुपयांच्या निधीची मागणी शालेय क्रीडा विभागाकडे करण्यात आली होती. मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे उर्वरित १५ कोटींहून अधिक रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे एकूण २३ कोटींच्या या क्रीडासंकुलाचे काम वेगाने सुरू झाले आहे.www.konkantoday.com