जिल्हास्तरीय लोकशाही दिन 6 जानेवारी रोजी

रत्नागिरी, दि. 1 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे जानेवारी 2025 चा लोकशाही दिन सोमवार दि. 6 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु.1 ते 2 वा. या वेळेत होणार आहे.

लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button