
वाकवली येथे बिबट्याच्या पिल्लाला जीवदान
. रिक्षाची धडक लागून जखमी अवस्थेत सापडून आलेल्या बिबट्याच्या पिल्लाला नुकतेच जीवदान देण्यात आले.वाकवली वसतीगृह येथे माळरानावर गिरीधर येलकर यांनी बिबट्याच्या पिल्लाला रिक्षा टेम्पोची धडक लागल्याने जागीच बसून असल्याची बातमी वाईल्ड ऍनिमल रेस्क्यू टिमचे मिलिंद गोरीवले यांना दिली. त्यांनी तत्काळ जागेवर जावून वाईल्ड ऍनिमल रेस्क्यू टिमने पाहणी केली असता बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला बसून असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांना कळवले. या नंतर या पिल्लाला सुरक्षित ताब्यात घेवून शासकीय वाहनातून पशुवैद्यकीय अधिकारी, दापोली यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. www.konkantoday.com