
हॉटेलवर दरड कोसळली! ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद!!
पौड : ताम्हिणी घाटाजवळील आदरवाडी (ता. मुळशी) येथे पिकनिक पॉईट हॉटेलवर दरड कोसळली. त्यामध्ये दोन जण हॉटेल खाली दबले गेले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे.*दरड हॉटेलवर कोसळून आदरवाडी येथील पुणे ते दिघीबंदर या मुख्य रस्त्यावर आली. यामुळे कोकणात ताम्हिणी मार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली.